जायकवाडी डावा कालवा: हजारो शेतकऱ्यांच्या समृद्धीचे स्रोत

जायकवाडी डावा कालवा: हजारो शेतकऱ्यांच्या समृद्धीचे स्रोत

क्रांतीभूमी मराठी न्युज ( मुकेश डुचे) :- मराठवाड्याच्या पाण्याच्या गरजांवर उत्तर ठरलेला जायकवाडी डावा कालवा, आज हजारो शेतकऱ्यांच्या समृद्ध जीवनाचे प्रमुख कारण ठरला आहे. या कालव्यामुळे कोरडवाहू भागातील जमिनींना पाण्याची शाश्वत सुविधा मिळाली असून, शेतकऱ्यांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडून आला आहे.

कालव्याच्या प्रवाहात सतत वाहणारे पाणी आज जवळपास हजारो हेक्टर शेतीला जीवनदान देत आहे. या पाण्यामुळे केवळ पारंपरिक पिके नव्हे, तर फळबागा, नवनवीन व्यापारी पिके आणि सेंद्रिय शेती देखील फोफावू लागली आहे.

समृद्धीची नवीन दिशा:या कालव्यामुळे –

शेतकरी आपल्या शेतात नव नवीन प्रयोग करून विविध पिके घेऊन स्वतः मार्केट मध्ये विकत आहे.त्यामुळे
शेतकरी आत्मनिर्भर झाले आहेत.

शेतीला योग्य वेळी खत, पाणी मिळत असल्याने पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढली आहे.
आजच्या बेरोजगारीच्या दुनियेत गावामध्ये पाणी असल्यामुळं गावात च काम मिळत, त्यामुळं बाहेर गावी रोजगारासाठी भटकंती करावी लागत नाही,स्थलांतर थांबून गावांची लोकसंख्या स्थिर झाली आहे.

शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी नवे दरवाजे खुले झाले आहेत.
शेतकऱ्यांचा विश्वास:
“हे पाणी आमचं भविष्य घडवतंय,” असं मत अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. यामुळेच जायकवाडी डावा कालवा केवळ एक पाटबंधारे प्रकल्प न राहता, समृद्धीचा कालवा बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *