खाजगी बस व टेम्पो चा अपघात,दोन ठार ७ जण जखमी
अंबड तालुक्यातील सुखापुरी फाटा येथील घटना..
तालुका प्रतिनिधी ( अशोक गायकवाड) :- राष्ट्रीय महामार्ग ७५३ वरती सुखापुरी फाटा येथे खाजगी बस व टेम्पो यात झालेल्या अपघातात २ जण ठार तर ७ जण जखमी झाल्याची घटना आज मध्य रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की,जालन्या कडुन परळी येथे लग्न समारंभासाठी जाणारी बस क्रमांक एम एच ४६ बी बी १७३२ व केज येथुन भोकरदन येथे कामांसाठी लेबर घेऊन जाणारा टेम्पो क्रमांक एम ०४ एफ जे ८९८३ यांची अंबड तालुक्यातील सुखापुरी फाटा येथे जोरदार अपघात झाला यात अंजना पुरुषोत्तम सपनार वय ३० रा.धानोरा,ता.सेलगाव,जि.हिंगोली यांचा जागीच मृत्यू झाला तर अनुसया पुरुषोत्तम सपनार वय १४ वर्ष हिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तर बाबासाहेब नाथराव सपनार रा.धानोरा,ता.सेलगाव जि.हिंगोली,संदिपान उमाजी शेप, वय ६० वर्ष रा.शेपवाडी,ता. अंबाजोगाई, सतिश गणेश लबडे वय ३५ वर्ष रा.तडेगाव, गयाबाई बाबुराव भोंडे वय ६५ वर्ष रा.शिराढोण, रामचंद्र फड वय ५५ वर्ष कनेरवाडी,विनय दिलीप नेहरकर वय २१ वर्ष रा.परळी,यश फुल्लारे वय २० वर्ष रा.परळी हे गंभीर जखमी झाले असुन या दोघा जणांची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींना जालना येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.
खाजगी बस व टेम्पो चा अपघात, २ ठार ७ जण जखमी..

Leave a Reply