पावसामुळे बाजरी पिकांचे नुकसान ..
क्रांतीभूमी मराठी न्युज :- राज्यात माघील काही दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला . उन्हाळी बाजरी पिकांवर परिणाम झाला आहे. चार दिवस सतत पाऊस चालू असल्याने बाजरी पिक काढणीस शेतकऱ्यांना वेळ मिळाला नाही,एक दिवस पावसाने विश्रांती दिल्याने शेतकऱ्यांनी बाजरी काढण्यास सुरुवात केली पण सायंकाळी 4 वाजता पावसाने पुन्हा वाद्लि वाऱ्यासह पुन्हा धुमाकूळ घातला आहे.
त्यामुळे बाजरी पिकामध्ये गुणवत्ता कमी झाली आहे तसेच बाजरी झाकून ठेवल्याने कर येऊ लागले आहे.त्यामुळे उन्हाळी बाजरी उत्पादन मध्ये घट होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Leave a Reply