खरीप हंगाम 2025 साठी महाडीबीटी पोर्टलवर बी बियाणे अनुदानासाठी अर्ज सुरू..

खरीप हंगाम 2025 साठी महाडीबीटी पोर्टलवर बी बियाणे अनुदानासाठी अर्ज सुरू..

क्रांतीभूमी मराठी न्युज: –  कृषी विभागाकडून खरीप हंगाम 2025 साठी “महाडीबीटी – शेतकरी योजना” पोर्टलवर प्रारंभिक/प्रमाणित बियाण्यांवर अनुदानासाठी अर्ज करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही योजना शेतकऱ्यांना अनुदानाच्या माध्यमातून उच्च प्रतीच्या बियाण्यांचा लाभ देण्यासाठी आहे.

ऑनलाईन अर्ज करताना खालील बियाणे चा उल्लेख करावा..सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, भात इ.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 29 मे 2025

बियाणे वितरण कालावधी: 1 जून ते 3 जून 2025 दरम्यान

शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर अर्ज सादर करावा. “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वावर अर्जांची निवड होईल. निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर संदेश पाठवण्यात येईल आणि त्यानंतर अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल

अर्ज करताना महाडीबीटी पोर्टलवर आपली माहिती अद्ययावत असल्याची खात्री करावी.वेळेत अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.तुमचा शेतीसाठीचा पुढचा हंगाम अधिक उत्पादनक्षम व फायदेशीर ठरावा यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *