जालना जिल्हायात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी ,
क्रांतीभूमी मराठी न्युज, जालना
अंतरवाली सराटी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त महिलांचा सन्मान
अंतरवाली सराटी ग्रा.प.कडून महिलांचा सन्मान लताबाई कोटंबे ,सावित्रीबाई तारख यांना पुरस्कार
———-
वडिगोद्री —
अंतरवाली सराटी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती साजरी..
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार अंतर्गत अंबड
तालुक्यामधिल ग्रामपंचायत / गट ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अंतरवाली सराटी येथील श्री कृष्ण अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती लताबाई भाऊसाहेब कोटंबे – खडके आणि अंगणवाडी मदतनीस सौ. सावित्रीबाई तारख या दोन महिलांना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” दि. 31/05/2025 रोजी ग्रामपंचायत कडून सन्मानित करण्यात आला आहे सरपंच श्रीमती कौशल्याबाई वसंतराव तारख , उपसरपंच सौ.स्वाती विष्णुपंत वाघमारे, पांडुरंग तारख ,
ग्रामसेवक श्रीमती शेख मँडम , ग्रा.प.सदस्य आनंद तारख, रतन गाडगे, छगनराव कोटंबे, सोमनाथ दखणे, अनिल तारख, विजय तारख, सतिष तारख, दिलीप दखणे, ग्रामपंचायत कर्मचारी
सतिष भाऊसाहेब तारख ,भागवत तारख, निखील जाधव, शुभम चाबुकस्वार
व ग्रामस्थ अंतरवाली सराटी यांच्या कडुन पुरस्कार प्राप्त महिलांचे स्वागत करण्यात आले.
पिठोरी शिरजगाव ग्रामपंचायत मध्ये जयंती साजरी करताना ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य
मौजे पिठोरी सिरसगाव मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंबड शहरात रॅलीचे आयोजन,
अंबड शहरांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य अशी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ,त्या रॅलीमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार ,पुण्यश्लोक अहिल्यादेवी चा विजय असो ,त्या रॅली मध्ये शेकडो महिला ,तरुण मुला, मुली, युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, त्या रॅली नी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते..
Leave a Reply