अंतरवाली सराटी चे सरपंच तारख यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार

क्रांतीभूमी मराठी न्यूज,

अंतरवाली सराटी चे सरपंच तारख यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार

अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील ग्रामपंचायत चे सरपंच श्रीमती कौशल्याबाई वसंतराव तारख यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच सेवा संघ अहिल्यानगर यांच्या कडून उत्कृष्ट आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला हा पुरस्कार अहिल्यानगर येथे शिर्डी चे खा.भाऊसाहेब वाघचौरे,अयोजक बाबासाहेब पावसे, महंत डॉ.श्रीकांतदास धुमाळ महाराज यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा रविवार ता.24 रोजी संपन्न झाला.

या ठिकाणी राज्यातील उत्कृष्ट ग्रामपंचायत, सरपंच, यांचा गौरव करण्यात आला. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत महत्वाची भूमिका बजावत असते सरपंच, सदस्य यांनी गावाच्या विकासासाठी लक्ष केद्रीत करावे मला ग्रामपंचायत मधील अडचणी बाबत माहिती आहे त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा. भाऊसाहेब

वाघचौरे यांनी सांगितले. या वेळी अंतरवाली सराटी चे सरपंच कौशल्याबाई तारख, पांडुरंग तारख,उपसरपंच स्वाती वाघमारे, ग्रा.प.सदस्य दिलीप दखने, आनंद तारख, सविता कोटंबे,रेणुका दखने, निता तारख, वैशाली तारख ,सविता गाडगे,निता सतिष तारख,ग्रामसेवक श्रीमती शेख , निखिल जाधव, हे या वेळी उपस्थित होते.

 

फोटो – उत्कृष्ट सरपंच पुरस्कार देतांना खा.वाघचौरे,महंत धुमाळ,पावसे, सरपंच तारख,सदस्य आदी दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *