उमेद अभियान चे प्रभाग समन्वयक हनुमान घुंबरे यांची जिल्हा परिषद सीईओ कडे तक्रार ..
क्रांतीभूमी मराठी न्यूज,
परभणी प्रतिनिधी : – पाथरी पंचायत समिती अंतर्गत उमेद अभियान मधील बाभळगाव प्रभाग समन्वयक यांची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे,
सविस्तर बातमी अशी आहे की, पाथरी तालुक्यातील बाभळगाव प्रभाग चे समन्वयक हनुमान घुंबरे यांनी ICRP यांना अरेरावी ची भाषा करतात. प्रभागातील ICRP प्रसूतीरजा वर असताना व तालुका ठिकाणी राहत असून सुधा त्याचे मानधन संबंधित प्रभाग समन्वयक यांनी काढले आहे , ते मानधन नेमके कोणाच्या खिशात गेले असा प्रश्न निर्माण होतो.तर मानधन काढताना वरिष्ट अधिकारी लक्ष देत नाही का? दुसरीकडे प्रभाग संघाचे साहित्य खाजगी कामासाठी वापरत असल्याचा आरोप तक्रारात नमूद करण्यात आला आहे, हनुमान घुंबरे हे काही ठराविक गावात च जास्त जातात,बाकी गावात फिरकत नाही आदी विषयासह आज रोजी श्रीमती शैलजा मोदे आणि प्रतीक्षा शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे, त्यावर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित पंचायत समिती गटविकास अधिकारी चौकशी करून कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply