केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पिठोरी सिरसगाव येथील पूरग्रस्तांना भेट…
क्रांतिभूमी मराठी न्यूज
अंबड (मुकेश डूचे) :- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दि. २५ सप्टेंबर गुरुवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील पुरग्रस्तांना भेट दिली. अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव सह परीसरात दि २२ सप्टेंबर रोजी रात्री मुसळधार पाऊस झाला होता.या पावसामुळे गल्हाटी नदीला पुर आला होता या पुराचे पाणी पिठोरी सिरसगाव येथील नागरिकांच्या घरात घुसून घरांतील संसार उपयोगी साहित्याचे तसेच खरीप हंगामातील सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुरपरिस्थिमुळे पिठोरी सिरसगाव येथील शेतीची व घरांची मोठी हानी झाली आहे.हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना आधार देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता पिठोरी सिरसगाव येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून त्यांना आधार दिला तसेच तहसीलदार अंबड यांना नुकसानग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.
अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव हे गाव गल्हाटी नदिच्या काठावर असुन गल्हाटी नदीला पूर आल्यास पुराचे पाणी गावात शीरते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.सन १९६९ साली गल्हाटी नदिला महापुर आला होता तेव्हा पिठोरी सिरसगाव येथील नागरीकांचे राज्य शासनाकडून पुनर्वसन करण्यात आले होते.त्यांना पुनर्वसनासाठी देण्यात आलेले पिठोरी सिरसगाव शिवारातील गट क्रं.२५ सर्वे नं.१६८ व गट क्रं.३०४ क्षेत्र ताब्यात देण्याची मागणी पिठोरी सिरसगाव येथील ग्रामस्थांनी ना.रामदास आठवले यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
Leave a Reply