बारासवाडा येथे शिक्षकांना निरोप सभारंभ..
क्रांतीभूमि मराठी न्यूज ( पंढरीनाथ माळकरी)
अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत आदर्श शिक्षक कुलकर्णी सर, गोल्हार सर, बारसवाडा ग्रामस्थ वतीने निरोप गावकऱ्यात व मुलाच्या डोळ्यात अश्रू,, अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील जिल्हा प्राथमिक शाळेत कुलकर्णी सर, व गोल्हार सर, मिरवणूक करण्यात आली होती,व मुलांनी लेझीम पथक आयोजन केले होते व गावात भावनिक वातावरण निर्माण झाले होते कुलकर्णी सर, आठ वर्षे शाळेत सेवा केली व गोल्हार सर यांनी 14 वर्षे सेवा केली कुलकर्णी सर, व गोल्हार सर, यांनी शैक्षणिक नव्हे तर गावकऱ्यांनी ही शिक्षक कसा असावा यांच्या प्रत्यक्ष अनुभव दिला नवनवीन उपक्रमक विद्यार्थी साठी आत्मविश्वास निर्माण करणे पालकाची सुसंवाद तसेच शाळेतील शैक्षणिक दर्जा उंच न्यायासाठी घेतलेली मेहनत हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य ठरले, गावकऱ्याची मते आज आम्ही चांगल्या शिक्षकाला निरोप देतो दुःख होते त्यांनी केलेली कामगिरी अतुलनीय आहे मुलाच्या मनात शिक्षणाची गोडी निर्माण करून त्यांनी उज्वल भविष्यासाठी त्यांनी भक्कम पाया घालून दिला गावातील व शाळेतील प्रत्येक नागरिक ऋणी राहील असे उदगार माजी सरपंच किसन तात्या गायकवाड, यांनी काढले शाळा यावेळी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राधाकिसन सावंत, सरपंच रामेश्वर खंडागळे, राजेंद्र सोनवणे, भगवान कापरे , आबासाहेब शिंदे, प्रस्तावित सावंत सर, यांनी केले आभार प्रदर्शन किसन तात्या गायकवाड यांनी केले यावेळी गावातील वातावरण उजळून निघाले कुलकर्णी सर, व गोल्हार सर, यांनी केले कार्य कायम रदयात राहील यावेळी गावातील बालक पालक ग्रामस्थ माजी मुख्याध्यापक चाटे सर, सर्व शिक्षक सर उपस्थित होते.व भावपूर्ण निरोप देण्यात आला.
Leave a Reply