मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची फी माफीसाठी निवेदन
क्रांतीभूमि मराठी न्यूज , (मुकेश डूचे)
प्रतिनिधी :
महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये विशेषत: मराठवाडा विभागात
अतिवृष्टी आणि गोदावरी नदीच्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीमुळे शेतकरी कुटुंबे आर्थिक संकटात सापडली असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर अंबड येथे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ट्युशन फी व परीक्षा फी तसेच दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेची फी शासनामार्फत माफ करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत :
-ओल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक आर्थिक सहाय्य जाहीर करावे.
-शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसोबत ट्युशन व परीक्षा फी पूर्णपणे माफ करावी.
-पुरग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण शासनाने निःशुल्क करावे.
-ओला दुष्काळ जाहीर करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीबरोबरच विशेष आर्थिक मोबदला द्यावा.
निवेदन देताना ॲड. मोहन रोटे, ॲड. कृष्णा साबळे, शरद खरात, ज्ञानेश्वर बोडकखे, ॲड. विलास राठोड, अभिषेक खरात आदी उपस्थित होते.
Leave a Reply