शहापूर येथे आनंद अनुभूती शिबीर संपन्न..
क्रांतिभूमी मराठी न्युज :- ( मुकेश डुचे) अंबड तालुक्यातील शहापूर येथे
दिनांक 14/05/025 ला आर्ट ऑफ लिविंग चे आनंद अनुभूती शिबिर घेण्यात आले, या शिबिरामधून योग, ध्यान,प्राणायाम सुदर्शन क्रिया,,आनंदी,प्रसन्न राहण्यासाठी तणावमुक्त जीवन, जगण्यासाठी आर्ट ऑफ लिविंग च्या क्रिया या शिबिरामधून घेण्यात आल्या शहापूर आणि पंचक्रोशीत ग्रामस्थ तरुण यांनी खूप चांगला प्रतिसाद या उपक्रमासाठी शिबिरासाठी देण्यात आला .
अत्यंत यशस्वी हे शिबिर शहापूर च्या ओम शांती विद्यालयामध्ये दिनांक 18/05/2015 रोजी अत्यंत उत्साहवर्धक आनंददायी वातावरण त संपन्न झालेआणि अनेक महिला मंडळी सुद्धा या शिबिरासाठी तयार आहेत अजून अनेक शिबिर या गावांमध्ये घ्यावे यासाठी तरुण सुद्धा उत्सुक आहेत . तसेच दि.18/05/2025 वार रविवार रोजी ओम् शांती विद्यालय, शहापूर ता.अंबड येथे आर्ट लिव्हिंग या संस्थेच्या माध्यमातून आनंद अनुभूती शिबिर उत्साहात पार पडला समारोप प्रसंगी शिबीर घेणारे प्रशिक्षक श्री फिरोज पठाण सर ,श्री वैभव खरात सर,श्री गणेश मिरकड तसेच शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री शिवाजी देवकर, श्री संतोष शिंदे व सर्व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार,अंबड यांनी परिश्रम घेतले.यावेळी एकुण 54 साधकांनी सुदर्शन क्रियाचा लाभ घेतला . या शिबिरासाठी ओम् शांती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री विश्वजीत दादा खरात यांनी जागा उपलब्ध करून दिली. त्यांचे सर्वांच्या वतीने आभार मानले.
धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंती व आर्ट ऑफ लिविंग चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या जन्मदिनानिमित्त शिबिर घेण्यात आले होते.
Leave a Reply