जिल्हायात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस..
वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार सुरुवात: मोसंबी, आंबा, कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
- क्रांतीभूमी मराठी न्युज: – महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सुरुवातीच्या पावसाने खरीप हंगामाच्या आगमनाची चाहूल दिली असली, तरी देखील अचानक आलेल्या वादळवाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोसंबी, आंबा ,कांदा उन्हाळी बाजरी सह शेतातील मोठ – मोठे झाले उपटून पडले आहेत, गावातील घरावरील पत्रे, गुराचे कोठे यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
फळपिकांचे नुकसान:
या पावसामुळे विशेषतः मोसंबी व आंबा फळपिकांना मोठा फटका बसला आहे. बहरात असलेल्या झाडांवरील फळे झाडावरून खाली पडल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडल्याची माहिती आहे.
उन्हाळी पिकांवर परिणाम:
पावसामुळे उन्हाळी कांदा, बाजरी व भेईमूग या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कांद्याचे काढणीचे काम सुरू असतानाच पावसामुळे शेतातील कांदा भिजल्याने त्याची साठवणूक अडचणीत आली आहे. बाजरी व भेईमूगच्या शेंगा व फुलांवरही पावसाचा प्रतिकूल परिणाम झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.
शेतकऱ्यांमध्ये चिंता:
या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान भरून येणार नाही, अशी भावना व्यक्त होत आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Leave a Reply