शेत रस्त्याच्या नोंदणीत मोठा निर्णय..

शेत रस्त्याच्या नोंदणीत मोठा निर्णय — आता १२ फूटाचा रस्ता ९० दिवसांत होणार नोंदित, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

क्रांतीभूमी मराठी न्युज: –  शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. राज्य शासनाने शेत रस्त्यांच्या नोंदणी प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता किमान १२ फूट रुंदीचा शेत रस्ता केवळ ९० दिवसांच्या आत महसूल नोंदणीत दाखल केला जाणार आहे.

हा निर्णय राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असून, शेतमाल वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांचे अधिकृत दस्ताऐवज तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे जमिनीच्या मालकीचे वाद, शेत रस्त्यांच्या अडथळ्यांचे प्रश्न आणि कागदोपत्री अडचणी सुटण्यास मदत होणार आहे.

१२ फूट किंवा त्यापेक्षा जास्त रुंदीचा शेत रस्ता आता थेट नोंदणी प्रक्रियेसाठी पात्र

अर्ज प्राप्त झाल्यानंतर ९० दिवसांत महसूल विभाग नोंदणी पूर्ण करणार

शेतकऱ्यांना अधिकृत मार्ग मिळाल्यामुळे कर्ज, योजना व माल वाहतूक सुलभ होणार हा निर्णय अंमलात येताच अनधिकृत व अडथळा निर्माण करणाऱ्या रस्त्यांवर आळा बसेल, तसेच गावपातळीवर होणाऱ्या वादांनाही मोठ्या प्रमाणात आळा बसेल.

शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय मिळाला असून, शेती विकासाच्या दृष्टिकोनातून ही एक सकारात्मक पावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *