दिवाळी होऊन एक महिना झाला तरी नुकसानभरपाई चे पैसे मिळेना, शहापूर येथील शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत….
क्रांतीभूमी मराठी न्यूज,
अंबड प्रतिनिधी (मुकेश डूचे ) :- माहे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे अंबड तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन,कापुस,तुर,बाजरी सह खरीपाची सर्व पिके तसेच फळ बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या पिकांची भरपाई म्हणून शासनाकडून मदत हि जाहीर करण्यात आली होती.हि मदत दिवाळी सणाला नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार होती परंतु महसूल विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे दिवाळी होऊन एक महिना होत आला आहे तरी सुद्धा अंबड तालुक्यातील शहापूर येथील शेतकरयांना अद्याप अनुदान मिळाले नाही त्यामुळे शेतकऱ्यां कडुन तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अतिवृष्टी मुळे शहापूर सह परीसरातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण खरीप पिकांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी पिकांसाठी लावलेला खर्च देखील निघला नाही.त्यामुळे शेतकरी मोठ्या डबघाईस आला आहे.शेतकर्यांना आधार म्हणून शासनाकडून नुकसान भरपाईसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे तसेच शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्यात यावी यासाठी शासनाकडून हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे, परंतु शहापूर येथील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली ना रब्बी हंगामातील पेरणी साठी देण्यात येणारी मदत मिळाली.रब्बी पिकांची पेरणी व अनुदान रब्बी पेरणीचा हंगाम निघून गेल्यावर शेतकऱ्यांना मिळणार आहे का असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
अंबड तालुक्यातील आतापर्यंत 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी अनुदान व रब्बी पेरणी चे अनुदान वर्ग करण्यात आले असुन बाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तहसील कार्यालया कडुन अपलोड करण्यात आल्या आहेत..
प्रतिक्रिया:-
अंबड तालुक्यातील आतापर्यंत 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी अनुदान व रब्बी पेरणी चे अनुदान वर्ग करण्यात आले असुन बाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तहसील कार्यालया कडुन अपलोड करण्यात आल्या आहेत..
विजय चव्हाण – तहसीलदार अंबड…
रब्बी पेरणी चा हंगाम संपत आला असुन अद्याप ही शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी अनुदान व रब्बी पेरणी साठी मिळणारे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही, संपूर्ण रब्बी पेरणी चा हंगाम संपल्यानंतर शासन शेतकऱ्यांना अनुदान वाटप करणार आहे का???
राहुल खरात – शेतकरी शहापूर…
शासनाकडून दिवाळी सणाला मिळणारे अनुदान दिवाळी होऊन एक महिना झाला तरी शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही, पुढील आठ दिवसांत जर शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही तर स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हजारो शेतकऱ्यांसह तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येईल.
मुकेश डुचे – अंबड तालुका उपाध्यक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना







Leave a Reply