तहसीलदाराला ट्रॅक्टर वरून ढकलून देत ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न शहागड गोदावरी नदी पात्रात घडली घटना
क्रांतीभूमी मराठी न्युज, अशोक गायकवाड
अंबड तालुका प्रतिनिधी: अबंड तालुक्यातील शहागड येथे रविवारी सकाळी महसूल अधिकारावर थरारक घटना घडली. अबंड तहसीलदार विजय चव्हाण यांना गुप्त बातमीदार कडून माहिती मिळताच हे अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई करण्यासाठी गोदावरी नदीपात्रातील शहागड जुनापुल येथे अचानक धाड टाकली.
यात दोन ट्रॅक्टर पकडले तर दोन पळून गेले पकडलेले दोन ट्रॅक्टर पैकी गेवराई तालुक्यातील वाळू तस्कंर इशान इबान शेख रा. तहसील कार्यालय जवळ रा. गेवराई जि.बीड यांच्या सोबत असलेल्या तिघांनी तहसीलदार विजय चव्हाण यांना आम्ही बीड जिल्ह्यातील असून तो आमच्या ट्रॅक्टर कारवाई का करतोस आज तुला बघतोस असे म्हणत अंगावर ट्रॅक्टर टाकत जिवघेणा हल्ला केला तसेच ट्रॅक्टर खड्यात गेल्यामुळे पलटी झाले त्यावेळी चार जणांनी जवळ घेऊन धमकी दिले आता काढ्या होत्या तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांनी त्यांच्या खाजगी बंदुकीतून हावेत चार राऊंड फायर केले.
यावेळी वाळूतस्कंर पळून गेले त्यांच्या सह त्यांच्या पथकांने दोन ट्रॅक्टर जागेवर धरत, पळाल्या तिघांनी दोन ट्रॅक्टर पळून नेले. हि घटना रविवारी सकाळी घडली यामध्ये तहसीलदार विजय चव्हाण यांनी गेवराई येथील वाळूतस्कराच्या दोन ट्रॅक्टरसह दोन ट्राली एक ब्रास वाळू असा सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला, याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात तहसीलदार विजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरण चार आरोपी विरोधात गौण खनिज कायदा शासकीय कामात अडथळा आणि जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणी 307 अन्वेय गुन्हा दाखल केलेला असेल पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर हे करीत आहेत.
Leave a Reply