धाकलगाव येथे मुख्य रस्त्याला आले तळ्याचे रूप

धाकलगाव येथे मुख्य रस्त्याला आले तळ्याचे रूप

क्रांतीभूमी मराठी न्यूज,

धाकलगाव प्रतिनिधी ,( कैलास खरात)  अंबड तालुक्यातील जालना वडीगोद्री रोडवरील जिल्हा परिषद सर्कल चे गाव धाकलगाव आहे ,सध्या पाऊशाळा सुरू असताना धाकलगाव मधील मुख्य रस्त्यावर तळ्याचे रूप धारण झाले आहे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अंगणवाडी, शाळे मधील विद्यार्थ्यांची येण्या जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर 100 फुटापर्यंत पावसाचे पाणी आणि घाण पाणी रस्त्यावर असल्याने मोठ्या कसरतीने रस्ता पार करावा लागतो तर मोटर सायकल स्वार त्या पाण्यातून भरधाव वेगाने गाडी घेऊन गेल्यास पायंधळी चालणाऱ्या नागरिकाच्या अंगावर शिंतोडे उडतात त्यामुळे नागरिकाचा नाहक मनस्ताप वाढत आहे ,तसेच थोड्या प्रमाणात रस्त्यामुळे मोटरसायकल स्वार मुळे व वाद-विवाद सुद्धा होतात अनेक वेळा ग्रामपंचायत मध्ये तक्रार केली असता अद्याप पर्यंत त्या रस्त्यात बाबत कोणत्या प्रकारची विल्हेवाट लावण्यात आले नाही असे शिवसेना उबाठा गटाचे तालुका उपाध्यक्ष अंबड प्रभू बामणे यांनी केला आहे.

या पाण्यामुळे साथीच्या रोगाला निमंत्रण देण्यासारखे आहे.  पुढील आठ दिवसात सदरील रस्त्यावरील सांडपाण्याची पावसाच्या पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावावी नसता ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *