आता सरकार तटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषिमंत्री यांना निवेदन..
क्रांतिभूमी मराठी न्यूज
वडीगोद्री / प्रतिनिधी
मागील वर्षी फळबागांसाठी प्रति हेक्टरी ३६ हजार आणि कोरडवाहू पिकांसाठी १८ हजार रुपये मदत मिळत होती. मात्र, आता सरकार तटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसत आहे.
आमदार, खासदार आणि नोकरदारांच्या पगारात कपात होत नाही, मग शेतकऱ्यांच्या अनुदानातच कपात का होते? हे सरकार अधिकाऱ्यांचे आहे की शेतकऱ्यांचे? असा संतप्त सवाल कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी विचारला.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी जालना जिल्ह्यातील धाकलगाव येथे आले होते.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन कृषी मंत्र्यांनी देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,जालना जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तसेच अनेक महसूल मंडळात सततच्या पावसामुळे खरीपिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे न करता सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी.
जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करण्यात यावी.अतिवृष्टी नुकसान भरपाईचे आर्थिक निकष पूर्वीच्या प्रमाणे करण्यात यावे.खरीप पिक विम्याचे निकष पूर्वीप्रमाणे करण्यात यावे आधी मागणीचे निवेदन देण्यात आले या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुरेश काळे,तालुका अध्यक्ष उमेश पाष्टे, तालुका कार्याध्यक्ष मुकेश डुचे आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या.
Leave a Reply