क्रांतीभूमी मराठी न्यूज,
जालन्यात अनुदान वाटप घोटाळ्यात कर्मचार्यांवर गुन्हे दाखल झाल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून स्वागत..
दोषी कर्मचार्यांना तात्काळ अटक करून रक्कम वसूल करावी..
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी.
अंबड:- आज दिनांक 20 बुधवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्यात 28 कर्मचार्यांवर गुन्हे दाखल झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जालन्यातील वडीगोदरी येथे फटाके फोडून स्वागत केलंय. घनसावंगी आणि अंबड तालुक्यात शेतकर्यांचं अनुदान कर्मचार्यांनीच लाटल्याचं उघडीकीस आलं होतं. या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनं केले होते.. आता 28 कर्मचार्यांवर गुन्हे दाखल झाले मात्र अद्याप 48 जणांवर गुन्हे दाखल होणे बाकी आहे. त्यामुळं उर्वरित कर्मचार्यांवर गुन्हे दाखल करावेत. दोषी कर्मचार्यांना तात्काळ अटक करून त्यांच्याकडून अपहारित रक्कम वसूल करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
जोपर्यंत त्या दोषी कर्मचाऱ्यावरील गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे या प्रकरणाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या आठ महिन्यापासून लढा सुरू होता.
यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे गुन्हे दाखल झाले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
उपविभागीय अधिकारी अंबड यांच्या वतीने अंबड पोलीस ठाण्यात 28 दोषी कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.घनसावंगी तालुक्यातील उर्वरित 48 कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल होणे बाकी आहे. जोपर्यंत त्या दोषी कर्मचाऱ्यावरील गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे या प्रकरणाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या आठ महिन्यापासून लढा सुरू होता. या लढ्याला अखेर आता यश आलेला असून दोषी अधिकाऱ्यांना आता अटक होऊन त्यांनी अपहारित केलेल्या रकमा त्यांच्याकडून वसूल कराव्यात यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना लढा देणार आहे.
Leave a Reply