घुंगर्डे हादगाव येथील मत्स्योदरी विद्यालयात वृक्षारोपण
अंबड तालुका प्रतिनिधी :- (मुकेश डूचे)
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील मत्स्योदरी विद्यालयात पर्यावरण मंत्रालय भारत सरकार तथा महाराष्ट्र राज्य पर्यावरण मंत्रालय व शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रेरणेने दि. १९ जुलै रोजी मत्स्योदरी विद्यालय घुंगर्डे हादगाव येथे एक पेड मा के नाम या अभियानांतर्गत कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सरदारसिंग पवार, कल्याण खापरे , आप्पासाहेब गव्हाणे, भाऊसाहेब मस्के, भगवानराव शिंगटे, भागवत महाराज दोबाले, बाबासाहेब हराळे, बंडु शिंगटे, विशाल भैय्या पवार, कल्याणराव घुले सह आदी पालक उपस्थित होते. यावेळी मसोदरी विद्यालयाचे मुख्याध्यापक कल्याण सोळुंके यांनी सांगितले की, वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक तरी झाड लावायचे आणि त्या झाडाचे संगोपन झाले पाहिजे. मुख्याध्यापक कल्याण सोळुंके यांनी सांगितले की एक पेड मा के नाम अंतर्गत ५०० झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित पालक विद्यार्थी यांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मसोदरी विद्यालयाचे मुख्याध्यापक कल्याण सोळुंके, सहशिक्षक नारायण पवार, रामदास वाघमारे, भीमराव बांगर, शिवाजी येटाळे, दिगंबर कोळंबे, ताराचंद खराद, मतीन बागवान, रवींद्र गुरव, संदीप लांडगे, संतोष पटेकर, सैफ शैख, हनुमंत नांद्रे, चंद्रकांत काळुंके, कचरू मरकड, रामकिसन पांढरे, अशोक बोराडे उपस्थित होते.
Leave a Reply