उमेद महिला ग्राम संघ साहित्य खरेदी मध्ये झालेल्या गैरव्यवहार चौकशी करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी...
शहापूर:- अंबड तालुक्यातील उमेद महिला ग्राम संघा मध्ये साहित्य खरेदी मध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या विषयी सविस्तर माहिती अशी की, अंबड तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत असलेल्या ग्राम संघांना, ग्रामसंघ स्टार्ट स्टार्टअप निधीमधून दहा हजार रुपयाचे साहित्य खरेदी करण्याची तरतूद असताना उमेद मध्ये काम करणाऱ्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी 31 हजार 700 रुपयांचे बोगस बिले दाखवून अंबड तालुक्यातील 111 ग्रामपंचायत मध्ये जवळपास 21 लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष मुकेश डुचे यांनी केला आहे. या आधी त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी पंचायत समिती कार्यालय अंबड येथे वारंवार अर्ज व निवेदन दिले आहे परंतु त्यांच्या या निवादानाची कुठलीही दखल पंचायत समिती कार्यालय अंबड कडून घेण्यात आली नाही. येत्या दहा दिवसात या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास पंचायत समिती कार्यालय अंबडसमोर आत्मदहन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष मुकेश डुचे यांनी दिला असून याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाचे राहील….
उमेद महिला ग्राम संघ साहित्य खरेदी मध्ये झालेल्या गैरव्यवहार चौकशी करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी...

Leave a Reply