गल्हाटी नदीला पूर आल्यामुळे पिठोरी सिरसगाव मध्ये शिरले पाणी
क्रांतिभूमी मराठी न्यूज, ( मुकेश डूचे)
ओला दुष्काळ जाहीर करण्याची वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष अंबड किशोर भगवान तुपे यांची प्रशासनाकडे मागणी
अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव हे गाव असून गल्हाटी ही गोदावरीची उपनदी या भागातून वाहते. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने या नदीला पूर आला असून बबन टाकसाळ, नारायण कांबळे, लक्ष्मण तुपे, वाल्मीक सांगळे, दिगंबर भारती, आदी गोरगरीब जनतेच्या घरात या नदीचे पाणी शिरले असून घरगुती साहित्य, धान्य, कपडे व घरातील काही सामान वाहून गेले असून बुद्ध विहारात ही पाणी शिरले आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांना या पुराचा तडाखा बसला असून शेतातील ऊस, कापूस, तूर, सोयाबीन, आदी पिके पाण्याखाली गेल्याने या अस्मानी सुलतानी संकटामुळे अर्थिक मोठे नुकसान झाले असून मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून ग्राम महसूल अधिकारी शिंदे साहेब व ग्रामसेवक जे. डी. चव्हाण यांनी तात्काळ गावात जाऊन पाहणी करून पंचनामे केले आहे. परंतु त्या गावकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची व ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अंबड.किशोर भगवान तुपे, सरपंच कृष्णा आटोळे, उपसरपंच पांडुरंग उढाण, ग्रामपंचायत सदस्य प्रेमानंद उढाण, लखन तुपे, भास्कर खरात, भागवत उढाण, स्वा.संघटनेचे तालुकाध्यक्षउमेश पाष्टे आदी गावकऱ्याने प्रशासनाकडे केली आहे.
Leave a Reply