क्रांतीभूमी मराठी न्यूज,
अंबड तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्या
पुरोगामी संघर्ष परिषदेची मागणी …
अंबड 🙁 जालना जिल्हा)- अंबड तालुक्यातील सुखापुरी मंडळात अतिवृष्टीमुळे आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी भयभीत झाला असल्यामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना त्यांचे खात्यावर थेट नुकसान भरपाई देऊन बळीराजाला आधार देण्याचं काम मायबाप सरकारने करावे अन्यथा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेचे मराठवाडा वरिष्ठ अध्यक्ष श्याम साळवे यांनी अंबड तालुक्याचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
पुढे बोलताना श्याम साळवे म्हणाले की सुकापुरी मंडळात दिनांक 15- 8- 2025 ते 18- 8 2025 या कालावधीमध्ये शहापूर, दाढेगाव,मठतांडा, शिरसगाव, धाकलगाव, रेवळगाव,बारसवाडी, कुक्कडगाव, जालोरा,बनगाव, दहेगाव,वडीकाळ्या, रुई,भाडी या गावांमध्ये अतिमुसळधार आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतातील अनेक ठिकाणी पिकासहसित जमीन खरडून वाहून गेली असल्यामुळे व अनेक ठिकाणी बरेच दिवस पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकरी भयभीत झाल्यामुळे आपण तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश देऊन मायबाप सरकारने संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन आधार द्यावा.
सदर शिष्ट मंडळामध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेचे अमोल नरोटे, राजेंद्र कापसे, मनोज वाघ इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply