स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा विधी महाविदयालय यवतमाळ येथे वृक्षारोपण
क्रांतीभूमी मराठी न्यूज,
अकोला प्रतिनिधी. 🙁 स्वप्नील चव्हाण) विद्या प्रसारक मंडळ, यवतमाळ चे संस्थापक सदस्य तथा स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांची एकशे दोन वी जयंती स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयामधे वृक्ष लागवड करून साजरी करण्यात आली. विधी महाविद्यालयामधे बाबूजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर महाविद्यालय परिसरात वृक्षरोपन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्या प्रसारक मंडळ चे सचिव सी.ए.
प्रकाश चोपडा, उपाध्यक्ष डॉ. ललीत निमोदिया सहसचिव अड. महेंद्र ओसवाल, सदस्य अड. देवकिसन शर्मा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजेश मुणोत, अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक डॉ. संदीप नगराळे, वृक्षप्रेमी श्रीमती विनिता सिंग व मित्रमंडळ त्याचप्रमाणे डॉ. वैशाली फाळे, डॉ. स्वप्नील सगणे, डॉ. नितीन कोथळे, प्रा. अंजली दिवाकर, प्रा. वंदना पसारी, प्रा. मृणाल काटोलकर, प्रा. योगीता बोरा, प्रा. पल्लवी हांडे ईत्यादी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
Leave a Reply