घरकुल लाभार्थी यांचे लेखी आश्वासन नंतर आंदोलन स्थगित..
क्रांतीभूमी मराठी न्यूज,
– अंबड तालुक्यातील दाढेगाव येथील रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत२०२४-२५ मध्ये घरकुल मंजूर आहे लाभार्थी राजु दशरथ काकडे, संजय दशरथ काकडे, गोविंद रतन काकडे यांचे घरकुल बांधकाम चालू आहे शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू देण्याचे जाहीर केले व आँनलाईन करुन ही गोदावरी नदीची बाळु मिळत नसल्याने घरकुलाचे काम कराचे कसे असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांच्या समोर उभा आहे त्यामुळे आज रोजी घरकुल लाभार्थी राजू काकडे यांनी गल्हटी नदीमध्ये बेमुदत आंदोलन सुरू केले होते. जवळपास 5 फूट खडा खोदून लाभार्थी राजू काकडे यांनी स्वतः वाळू मध्ये पुरून घेतले होते. काही तासानंतर महसूल कर्मचारी यांनी भेट देऊन विनंती केली.पण विनंती वरून आंदोलन मागे हटले नाही तर लेखी आश्वासन नंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.पुढील पंधरा दिवसात मार्ग नाही निघाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Leave a Reply