बोगस घरकुल प्रकरणी त्या अभियंत्याचे चौकशीचे आदेश..
क्रांतीभूमी मराठी न्यूज,
अंबड:-अंबड तालुक्यातील धाकलगाव सर्कल मधील रमाई घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजना अशा विविध घरकुल योजनेतील बोगस घरकुल बांधकामाची स्थळ पाहणी करून चौकशी करण्याची मागणी वंचीत बहुजन आघाडी च्या वतीने गट विकास अधिकारी पंचायत समिती अंबड यांना दि ४ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात केली होती.
धाकलगाव सर्कल मधील विविध घरकुल योजनेतील जे.एस पिसुळे गृहनिर्माण अभियंता पंचायत समिती अंबड यांनी लाभार्थ्यां सोबत अर्थीक संगणमत करून जुने घर दाखवुन लाभार्थ्यांना नविन घरकुल बांधकाम न करता ही घरकुल अनुदानाचे हप्ते वितरीत केल्याचा आरोप वंचीत बहुजन आघाडी ने केला आहे.या निवेदनाची दखल घेत विस्तार अधिकारी पंचायत समिती अंबड एम.एस.वैष्णव यांनी गृहनिर्माण अभियंता जे.एस.पिसुळे यांना पत्र काढुन सुचना दिल्या आहेत कि, तक्रार अर्जात नमूद मुद्यासंदर्भात लवकरात लवकर अहवाल देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
Leave a Reply