बारसवाडा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा 

बारसवाडा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा 

क्रांतीभूमी मराठी न्यूज,

बारसवाडा प्रतिनिधी (पंढरीनाथ माळकरी) :- 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारसवाडा केंद्र डोणगाव तालुका अंबड जिल्हा जालना येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शालेय प्रांगणात ध्वजारोहण आदर्श शिक्षक श्रीधर यशवंतराव कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राधाकिसन सावंत प्रमुख पाहुणे सरपंच रामेश्वर खंडागळे, उपसरपंच गजानन सावंत उपाध्यक्ष आबासाहेब शिंदे, मुख्याध्यापक कैलास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापुजनाने झाली. हर घर झेंडा अंतर्गत रांगोळी स्पर्धा मधील विजेत्या व सहभागी स्पर्धकांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने बक्षिसे देण्यात आली.ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने शाळेसाठी संगणक भेट देण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी भाषणे व देशभक्तीपर गीते सादर केली. संगीत कवायतीचे आयोजन करण्यात आले होते.ग्रामरोजगार सेवक अनिल सावंत यांची अंबड तालुका ग्रामरोजगार सेवक उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.माजी सरपंच किसनराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तत्पूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात श्री सुभाष सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.हर घर तिरंगा अंतर्गत रांगोळी प्रदर्शन,रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी ७५० व्या जयंती वर्षानिमित्त शाळेत पसायदान (दि.१४) रोजी घेण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष सुभाषराव मिठे,व्हाइस चेअरमन प्रविणराव वाकडे,विष्णू पवार,संतोष गोळे,राम मुळक,ग्रामसेवक जगताप साहेब शिक्षक संतोष सावंत,अर्जुन खोंडे,गोकुळ बोबलट,सुरेखा जाधव,अंगणवाडी सेविका लताबाई मुळे,गीताताई सुळे विद्यार्थी,पालक ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *