गुरू शिष्य परीवारातर्फे बारसवाडा जि.प. शाळेचा आदर्श शाळा पुरस्काराने गौरव
क्रांतिभूमी मराठी न्यूज,
बारसवाडा प्रतिनिधी पंढरीनाथ माळकरी
अंबड- गुरू शिष्य परीवार जालना तर्फे बारसवाडा जिल्हा परिषद शाळेस जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानचिन्ह देऊन शिक्षकदिनी (दि.५) रोजी गौरविण्यात आले.
जालना येथील श्री आनंद मंगल कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.प्रमोद कुमावत, धाराशिव जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी रविंद्र जोशी,गुरू शिष्य परीवाराचे संस्थापक अध्यक्ष किशोर खंडाळे यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांना मानाचा फेटा,शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
शाळेला आदर्श बनविण्यासाठी प्रयत्नशील असलेले विद्यार्थी,शिक्षक,मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.या यशाबद्दल शाळेचे अंबड तालुका गटशिक्षणाधिकारी दिनेश शिनगारे,केंद्रप्रमुख रामेश्वर आंबटकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राधाकिसन सावंत,उपाध्यक्ष आबासाहेब शिंदे,सरपंच रामेश्वर खंडागळे,माजी सरपंच किसनराव गायकवाड, गुरू शिष्य परीवाराचे उपाध्यक्ष बाबासाहेब ओळेकर सचिव योगेश मोरे,सुनिल ढाकरके,अनंत पुरंदरे,डोणगाव केंद्रातंर्गत मुख्याध्यापक, शिक्षक,ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
Leave a Reply