बी एल महाडीक विद्यालयाचा आषाढी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
क्रांतीभुमी मराठी न्यूज,
कडेगांव तालुका प्रतिनिधी (मुकुंद सुकटे) : -कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील बी एल महाडिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विठू नामाचा गजर करीत आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करत ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पालखीत श्री.विठ्ठल-रखुमाईची मूर्ती व कर्मवीरांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. पंढरीची वारी ही ईश्वरी प्रेमाची एक विलक्षण अनुभूती आहे. वारी ही साधना असून दिंडी हे एक साधन आहे.सातत्य,नियमितपणा व सामूहिक भक्ती ही वारीची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
शालेय विद्यार्थ्यांना सांस्कृतिक वारशाची जाण आसावी त्याचबरोबर दिंडीतील सर्वांच्या सहभागातून धार्मिक सलोखा व धर्मनिरपेक्षता या संविधानात्मक तत्वांतून राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण व्हावी व त्यांच्यात अंगीभूत असणारी उपक्रमशीलता वाढीस लागावी या हेतूने आषाढी एकादशीनिमित्त या दिंडीचे आयोजन करण्यात आले.पालखी सोहळ्याद्वारे समाजाशी जवळीक वाढावी व संत परंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने दिंडी काढीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अवघे गाव भक्तिमय व ज्ञानमय केले.
विद्यार्थिनींच्या फुगड्या शाळेपासून निघालेल्या या दिंडीत प्रारंभी भगवा ध्वज घेऊन नाचणारे बालवारकरी,त्यांच्यामागे विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिरुपातील विद्यार्थी,नंतर टाळकरी,मध्येच मृदंगवादक,विणेकरी व डोक्यावर ग्रंथ ,तुळशी व रोपे घेऊन आलेल्या बालमहिला वारकरींसह सर्व विद्यार्थी ‘विठूनामाचा’जयघोष करीत–’सोपे वर्म आम्हा सांगितले संती! टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा!’ या उक्तिप्रमाणे पाऊल खेळत गावातील श्रीराम मंदिरा जवळ ही दिंडी स्थिरावली. गावातील श्रीराम मंदिरा समोर विद्यार्थ्यांनी व शिक्षिकांनी फुगडी व पाऊल खेळण्याचा आनंद घेत दिंडीत रंग भरला .
यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापक उप मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका व सहकारी उपस्थित होते
Leave a Reply