देवळा महाविद्यालयात अँटी-रॅगिंग जनजागृती व्याख्यान
क्रांतीभूमी मराठी न्यूज
देवळा प्रतिनिधी प्रवीण आहेर :
रामरावजी आहेर महाविद्यालयात अँटी-रॅगिंग जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते वाणिज्य विभाप्रमुख प्रा. चंद्रकांत दाणी होते.
प्रा. दाणी यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना रॅगिंगच्या विविध प्रकारांची माहिती दिली. शारीरिक, मानसिक, मौखिक व सामाजिक रॅगिंग यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर होणारे दुष्परिणाम त्यांनी स्पष्ट केले. रॅगिंग हा केवळ गुन्हा नसून मानवी मूल्यांवर आघात करणारा कृत्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या भाषणात त्यांनी विशेष भर देत सांगितले की – “ग्रामीण भागात रॅगिंगची प्रकरणे तुलनेने कमी असली तरीही विद्यार्थ्यांनी शहरी भागात जाऊन शिक्षण घेताना कायद्याची माहिती, तक्रार प्रक्रिया व आपले हक्क याबद्दल जागरूक असणे गरजेचे आहे.”
प्रा. दाणी यांनी विद्यार्थ्यांना “रॅगिंग थांबवा – मैत्री वाढवा” हा प्रभावी संदेश दिला. तसेच “मैत्री वाढवा, भेदभाव नाही – हीच खरी परंपरा” या घोषवाक्याद्वारे समाजातील बंधुभाव व एकोपा जपण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर होते.
या कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply