वाणिज्य मंडळाच्या उद्घाटन सोहळ्यात विद्यार्थ्यांना यशस्वी व्यवसायाचे मंत्र
देवळा, प्रतिनिधी प्रवीण आहेर दि. ११ ऑगस्ट – “स्पर्धात्मक युगात व्यवसाय क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर आर्थिक शिस्त, कायद्याचे भान आणि सुशासनाची जाण आवश्यक आहे,” असा मोलाचा संदेश सीए डॉ. प्रशांतजी कदम यांनी देवळा महाविद्यालयातील वाणिज्य मंडळाच्या उद्घाटन सोहळ्यात विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांनी भूषविले. कार्यक्रमाची प्रास्ताविकातून वाणिज्य मंडळाच्या उद्दिष्टांची व आगामी उपक्रमांची माहिती देण्यात आली. पाहुण्यांची ओळख वाणिज्य विभागप्रमुख प्रा. चंद्रकांत दाणी यांनी करून दिली.
आपल्या मनोगतात प्रमुख पाहुण्यांनी कर, वित्त, कंपनी कायदे, तसेच उद्योग व दानसंस्थांच्या सुशासनातील अनुभव शेअर करताना विद्यार्थ्यांना वाणिज्य क्षेत्रातील विविध संधी, नोकरी व उद्योजकतेचे मार्ग याबद्दल सविस्तर माहिती दिली..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिपिका शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.किशोर सूर्यवंशी यांनी केले. यावेळी प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply