मुख्यमंत्री योजनादूत चे ३६ प्रशिक्षणार्थी वाऱ्यावर..
क्रांतीभूमी मराठी न्यूज,
अंबड तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण मधून ३६ सुशिक्षित बेरोजगार तरुणाची निवड करण्यात आली आहे. मात्र ६ महिने उलटून ही त्यांना कोणत्या ही प्रकरणाचे मानधन देण्यात आले नाही ,मागील सहा महिन्यांपासून ३६ तरुणांना पंचायत समिती मार्फत नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांना ऑनलाइन प्रणाली मध्ये समाविष्ट केल्या नसल्यामुळे त्यांना एक रुपया ही देण्यात आला नाही.संबंधित विभागाला चौकशी करून ६ महिने उलटले पण अजून पर्यंत काही ठोस निर्णय झाला नाही असे मुख्यमंत्री योजनादूत अनिल उधाण यांनी सांगितले आहे.लवकरात लवकर ऑनलाईन प्रणाली मध्ये आमचे नाव समाविष्ट करावे , व आम्हाला न्याय द्यावं असे म्हटले आहे.
Leave a Reply