स्वतःचा सीव्ही आणि अनुभवाची जोड हीच यशाची गुरुकिल्ली – डॉ.हरीशजी आडके
क्रांतीभुमी मराठी न्यूज,
देवळा प्रतिनिधी 🙁 प्रवीण आहेर)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत, आदिवासी सेवा समिती नाशिक व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या सहकार्याने मानूर महाविद्यालयात कार्यानुभव संधी व ऑन द जॉब ट्रेनिंग मेळावा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.हरीशजी आडके यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.भामरे होते. प्रमुख अतिथी डॉ.बी.जी.वाघ (माजी प्राचार्य केटीएचएम महाविद्यालय, नाशिक), उद्योजक संजयजी बगे (संस्थापक, वालसन इंडस्ट्रीज) उपस्थित होते. याचबरोबर कळवण व मानूर गावातील असंख्य उद्योजक, संस्था या ठिकाणी उपस्थित होते.
आजच्या काळात सीव्ही आणि अनुभव आवश्यक आहे. शिक्षणासोबत ऑन जॉब ट्रेनिंग अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. बेरोजगारीवर उपाय म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गुणवत्ता सुधार कार्यक्रमाच्या अंतर्गत कार्यानुभव संधी व ऑन द जॉब ट्रेनिंग उपक्रमाची सुरुवात केली आहे असे प्रतिपादन डॉ. हरीशजी आडके यांनी केले. “आयुष्यात ठरवलेलं ध्येय असणं गरजेचं आहे. आत्मविश्वास बाळगून मेहनत केली तर यश नक्की आहे असे प्रतिपादन डॉ.बी.जी.वाघ यांनी केले. त्यांचा जीवन प्रवास आणि ऑन जॉब ट्रेनिंग प्रोग्रॅम चे महत्व संजयजी बगे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. ए.डी.पानगव्हाणे यांनी व प्रास्ताविक प्रा. पी.के.आहेर यांनी केले तर आभार प्रा.व्ही.के.बोरसे यांनी मानले. सदर मेळाव्यास विद्यार्थी विद्यार्थिनी व तालुक्यातील सर्व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply