छत्रपती संभाजीनगर येथे गोवंशीय पशुचे चिकित्सक शिबिर राबवण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी (श्याम गरुड) :- डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांचा संयुक्त विद्यमाने माननीय श्री. अजय महाजन महानगर प्रमुख शिवसेना वैद्यकीय कक्ष छत्रपती संभाजीनगर यांच्या संदर्भित पत्रान्वये शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री.राजेंद्रजी जंजाळ यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून आज दिनांक 18/05/2024 रोजी सकाळी 9 पासून श्री महावीर जैन गोशाळा, चिकलठाणा, छत्रपती संभाजी नगर येथे गोवंशीय पशूंचे कार्यमोहीम शिबिराबविण्यात आले .या शिबिरामध्ये डॉ. विजया कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डॉ महेश पवार आणि डॉ.तळेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ संदीप राठोड, डॉ.रामेश्वर बोरकर, डॉ.निकिता राख,श्री. श्याम गरूड आणि श्री गोपाळ क्षीरसागर यांनी जंतनिर्मुलन, वंध्यत्व निवारण ,गर्भधारणा तपासणी, लसीकरण इत्यादी मोहीमा करण्यात आल्या.हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पणे पार पाडण्यात आला.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गौतम सोनी यांनी केले या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात परिसरातील तरुण आणि शेतकरी उपस्थित होते.शेतकऱ्यांना जंत निर्मूलन गोळ्या औषधे, देण्यात आली आणि वंधत्व निवारण, जंत निर्मूलन चारा व्यवस्थापन, सकस आहारा,वेळीवेळी घेयव्याची लशीकरण या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
Leave a Reply