छत्रपती संभाजीनगर परिसरात वाढतोय कचरा, परिसरात घाणीचे साम्राज्य
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी ( बबन घोडे) शासन विविध योजना राबवून कचरा व्यवस्थापन, स्वच्छता साठी लाखो रुपये खर्च करत आहे पण त्याकडे दुर्लक्ष होत त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन दुर्गंधी पसरत आहे ,त्यामुळे नागरिकाचे आरोग्य धोक्यात येत आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ च्या वतीने मोठ -मोठे जनजागृती चे बॅनर लावण्यात आले.छत्रपती संभाजी नगरात शहानुर मिया दर्गा परिसरात असलेल्या उच्च वसाहतीजवळ रस्त्यावरच कचरा टाकून घाण केली जात आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने यापासून रोगराईचा धोका संभवतो.
नियमित कचरा गाडी शहरभर फिरत असताना नागरिक मात्र रस्त्यावर अशाप्रकारे कचरा टाकून शहराच्या सौंदर्याला डाग लावत आहे.
Leave a Reply