गोंदी पोलिसांची कामगिरी बद्दल गौरव
क्रातिभूमी मराठी न्युज ( जालना) :- जालना ते बीड रोड वर सुखापुरी फाटयाजवळ १४ एप्रिल २०२५ रोजीच्या रात्री एका पत्रकाराला सुखापुरी कडे जात असताना एका टोळी नी लुटले होते, त्या टोळीचा गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी सिनेमा स्टाईल पाठलाग करून काही वेळात तीन आरोपींना जेरबंद करण्यात यश आले होते. यावेळी चोरट्याच्या ताब्यातून १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.या कामगिरी बद्दल सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्यासह सोबतच्या पोलीस अंमलदारांचा प्रभारी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला आहे.
Leave a Reply