सकल मराठा समाजातील बारावी उत्तीर्ण विधार्थीयांनी नाव नोंदणी करावी..प्रा .रेगुडे

क्रांतिभूमी मराठी न्युज: – गुणगौरव करण्यासाठी आर्थिक सहकाराचा हात पुढे करणाऱ्या मान्यवरांचे अभिनंदन!

तीस हजार रुपयाची गुणवंताच्या बक्षीस साठी आर्थिक मदत जाहीर

*शैक्षणिक क्रांतीतून समाजाची प्रगती* या उपक्रमांतर्गत समाजातील
शिक्षणाचे महत्त्व जाणणारे
आपल्या कर्तुत्वाने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून
आर्थिक सधन असणाऱ्या सकल कुणबी मराठा समाज बांधवांच्या आर्थिक योगदानातून गुणवंत गरजूवंत विद्यार्थ्याला शिक्षणासाठी अर्थसहाय्य केलं केला तर समाजातील
विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतील!
सामाजिक प्रगतीच्या उदात्त हेतूने सकल कुणबी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा
एच .एस.सी.व .एस.एस .सी बोर्ड परीक्षेत एस संपादन करणाऱ्या गुणवंत *विद्यार्थ्यांचा रोख बक्षीस देण्याचे संकल्पना मांडली.*

बारावीच्या आर्ट कॉमर्स सायन्स तिन्ही शाखेतील सर्व प्रथम ,सर्व द्वितीय ,सर्व तृतीय बक्षीसाची रोख रक्कम देण्यासाठी समाज बांधव मोठ्या मनाने पुढे आले.
या समाज बांधवांमध्ये
श्री करण मिठे यांनी बारावी विज्ञान शाखेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 5001 रुपये, वाणिज्य शाखेतून सर्व प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी श्री.डॉ.एल.बी.सावंत यांनी 5001 रुपये, तर मी भगवान /रेगुडे कला शाखेतून सर्वप्रथम साठी 5001 रुपये प्रथम बक्षाची रक्कम जाहीर केली.
सकल कुणबी मराठा
समाजाच्या मुली मधून विज्ञान शाखेत सर्वप्रथम येणाऱ्या *मुलीसाठी बक्षीस म्हणून 5001 रुपये अंबड तालुक्यातील गुलगे परिवाराने जाहीर केले.*
बारावी ‘आर्ट ,कॉमर्स सायन्स तिन्ही शाखेत सर्व द्वितीय येणाऱ्याविद्यार्थ्यांसाठी 3001रुपये देण्याचे श्री .जगन्नाथराव डोळस सेवानिवृत्त मुख्याध्यापक तालुका बदनापूर, Ad. श्री संदीप नरोडे उपसभापती बाजार समिती अंबड,
श्री संतोषराव मोहिते मा.सभापती पंचायत समिती जालना रेवगाव तालुका तालुका जालना हे समाजातील मान्यवर मोठ्या मनाने पुढे आले.बारावीच्या तिन्ही शाखेतील सर्व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2001 रुपये बक्षीस देण्याचे श्री.बाबासाहेब गायकवाड मा.सरपंच शहापूर तालुका अंबड.श्री बळीराम मोरे मच्छिंद्र चिंचोली ता.घनसांवगी,
श्री. रमेशराव वाबळे श्री वाबळे ट्रेडिंग कंपनी नवा मोंढा यांनी आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
वरील शैक्षणिक कार्यास योगदान करण्यासाठी मोठ्या मनाने पुढे येणाऱ्या सर्व समाज बांधवांचे सकल कुणबी मराठा समाजाच्या वतीने हार्दिक अभिनंदन! सकल मराठा समाजातील बारावी उत्तीर्ण विधार्थी यांनी https://sakalkunbimaratha.com/contact/ ह्या लिंक वर नाव नोंदणी करावी असे आव्हान करण्यात येत आहे..
*शिक्षणामुळे जीवनात प्रगती होते .याची अनुभूती कठीण परिस्थिती शिक्षण घेऊन जीवनात सुखी व आर्थिक सधन झाले. अशा शिक्षणाच ज्ञान आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणारे समाजरत्न सकल कुणबी मराठा समाजात आहे.
सकल कुणबी मराठा समाजातील अनमोल समाज रत्नांना प्रगतीरुपी धाग्याची भूमिका घेऊन एकत्र गुंफून शैक्षणिक विकास माला निर्माण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.
शेवटी प्रयत्नांती परमेश्वर
निस्वार्थ सेवा तिथे समाज रुपी परमेश्वर करीत असतो धावा म्हणूनच म्हणल्या जातं *समाजसेवा हीच ईश्वर सेवा.गरजवंत गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात द्यावा.त्यासाठी चालली ही समाजसेवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *