हसनापुर येथील ग्रामस्थ शाळेला ठोकणार कुलुप 

हसनापुर येथील ग्रामस्थ शाळेला ठोकणार कुलुप 

क्रांतिभूमी मराठी न्यूज 

 अंबड प्रतिनिधी 

अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथुनच जवळच असलेल्या हसनापुर येथील जिल्हा परिषद शाळेत एकच शिक्षकावर चालते शाळा यामुळे विद्यार्थ्यावर परीणाम होत आहे. हसनापुर येथे जिल्हा परिषदेची शाळा पहीली ते पाचवी पर्यंत शाळा आहे. एकुण विद्यार्थी संख्या ४३ आहे. परंतु या शाळेला एक बारा महिन्यापासुन शाळेत एकच शिक्षक आहे. यासाठी ग्रामस्थांनी विस्तार अधिकारी यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की, एक शिक्षक २०२१ पासुन निलंबित आहे.एकाच शिक्षकावर पाचही वर्गाचे अध्यापन व मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त कार्यभार असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता खालवत आहे. पालक आपल्या विद्यार्थ्यांना इतर शाळेत दाखल करण्याचा विचार करत आहे. यामुळे गावकऱ्यात तीव्र नाराजी पसरली आहे. शाळेला तात्काळ शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी अन्यथा ५ आकटोबर रोजी गावकरी शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत हसनापुर यांच्या वतीने शाळेला कुलुप लावुन शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी पत्रकार बंडु शिंगटे यांनी विस्तार अधिकारी दिनेश शिनगारे यांची संपर्क साधला असता लवकरच शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले. या निवेदनावर सरपंच नितीन मिरकड , संतोष मिरकड, चंद्रकांत मिरकड सह आदी गावकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *