कौडगाव ग्रामपंचायत कडून बदली झालेल्या शिक्षकांना निरोप समारंभ
क्रांतिभूमी मराठी न्यूज
मौजे कवडगाव तालुका अंबड जिल्हा जालना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवडगाव येथील शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यामध्ये श्री. टोणपे सर श्री.चौरे सर श्री. तारगे सर श्री.उढाण सर श्रीमती जायभाये मॅडम यांना शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन निरोप समारंभ साजरा करण्यात आला.
त्याप्रसंगी कवडगाव चे सरपंच,उपसरपंच,सदस्य. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply