मौजे पिठोरी सिरसगाव येथील पूरग्रस्तांना राशन किट वाटप..
क्रांतीभुमी मराठी न्यूज ( मुकेश डूचे)
मागील काही दिवसापासून मराठवाड्यात पावसाने हाहाकार केलेला आहे. अंबड तालुक्यातील पिठोरी शिरसगाव येथे मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे गलाहाटी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेंशी भरलाय तसेच सुखापुरी येथील धरण सुद्धा भरल्याने गलाहाटी नदीला महापूर आला आहे त्या महापुराने पिठोरी सिरसगाव मध्ये गावात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, संसार उपयोगी साहित्य भिजले मुळे दैनंदिन जीवनाचा प्रश्न निर्माण झाला होता . सामान्य नागरिकाचे जनजीवन विस्कळीत झाल्याने राहण्याची तसेच जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता, अंबड तहसीलदार विजय चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पिठोरी सिरसगाव येथील पूरग्रस्त नागरिकांना राशन कीट वाटप करण्यात आले आहे तसेच तहसीलदार विजय चव्हाण साहेब यांनी पूरग्रस्त नागरिकांना थेट संवाद साधत आधार दिला आहे. पुढील काही तास पावसाची शक्यता असल्याकारणाने सतर्क राहण्याचे आव्हान सुद्धा केलेले आहे राशन कीट वाटप करण्यात आले आहे,
त्यावेळी पशुधन पालक यांचा सुधा विषय गंभीर असून गावच्या बाजूने ओढे, नदी असल्याने शेतात जाणे शक्य नाही त्यामुळे जनावरे उपाशी राहतात,त्याच्या चारा ची मागणी करण्यात आली आहे, उपस्थित पुरवठा अधिकारी खांडेकर साहेब तलाठी सतीश शिंदे, ज्येष्ठ नागरिक विष्णुपंत पाष्टे, संभाजी उढाण, रामेश्वर माने, आबासाहेब खोमणे, चंद्रकांत पांढरे, कृष्णा जरांडे , लक्ष्मण तुपे, राजू डूचे, अंकुश खोमणे ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Leave a Reply