शहागड व वाळकेश्वर गावातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
क्रांतीभूमि मराठी न्यूज (मुकेश डूचे)
गोदावरी नदी पात्रात रात्री अचानक पाणी सोडण्यात आल्यामुळे शहागड व वाळकेश्वर या गावांतील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या कार्यवाहीत महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेवर केलेली मदत व समन्वय अतिशय उल्लेखनीय ठरला.
या बचावकार्यात माननीय जिल्हाधिकारी मित्तल मॅडम अप्पर जिल्हाधिकारी मैत्रेवार मॅडम,उपविभागीय अधिकारी पारधी साहेब,तहसीलदार विजय चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शना खाली मंडळ अधिकारी नरुटे साहेब व ग्राम महसूल अधिकारी रामकिसन महाले यांनी पुढाकार घेत मोलाची भूमिका पार पाडली. तसेच ग्राम महसूल अधिकारी गुरव, अनारूपे, तुपकर, ग्रामसेवक, सरपंच बबलू कादरी वाळकेश्वर, जोगदंड शहागड, अरबाज तांबोली, परमेश्वर मोहिते, भगवान माने, रजोद्दीन पटेल,इ यांनी देखील घटनास्थळी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन केले व स्थलांतराची प्रक्रिया सुरळीत पार पाडली.
यासोबतच कृषी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सुद्धा पूर्ण सहकार्य केले. गावातील नागरिक, स्वयंसेवक व तरुणांनीही शासकीय यंत्रणेसोबत खांद्याला खांदा लावून मदतकार्य केले.
शहागड व वाळकेश्वर गावातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
स्थानिक ट्रॅक्टर-ट्रॉली व इतर साधनसामग्रीच्या मदतीने घरातील आवश्यक वस्तू सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्या. रात्रीच्या वेळी ही मोहीम राबविणे आव्हानात्मक असले तरी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या प्रसंगी गावकऱ्यांनी महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाचे आभार मानले. भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगीही नागरिकांना त्वरित मदत करण्यास शासन व प्रशासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
Leave a Reply