क्रांतीभूमी मराठी न्यूज,
बारसवाडा प्रतिनिधी ( पंढरीनाथ माळकरी)
जालना जिल्ह्यातील ठीक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन,
प्रहार जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व माननीय श्री बच्चु कडु यांच्या नेतृत्वाखाली धुळे सोलापूर राष्ट्रीय मार्गावर शेतकरी कर्जमाफीसाठी भव्य रास्ता रोको आंदोलन दि. २४-७-२०२५ सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती समोर अंबड व घनसांगी तालुका अध्यक्ष राम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली वडीगोद्री येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या वेळी वडीगोद्री बारस वाडा ,धाकलगाव, पिठोरी शिरसगाव ,शहापूर दाढेगाव शोभा नगर आंतरवाली ,रामगव्हाण ,महाकाळा इत्यादी गावातील शेतकरी सहभागी झाले होते कर्जमाफीसाठी रामभाऊ ठाकूर श्रीमंत तात्या कटके वायाळ इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले सरकारने कर्जमाफीची घोषणा देऊन नुसते घोषणा देत आहे व शेतकऱ्याच्या दिशाभूल करीत आहे शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही सरकार नको तिथे पैसा खर्च करतो शेतकऱ्याच्या व्यथा प्रलंबित आहे तरी शासनाने शेतकऱ्याचे कर्जमाफी करावी व सातबारा कोरावा करावा व शासनाने याची दखल घ्यावी .
Leave a Reply