जालना शहरात भव्य तिरंगा रॅली ..

 जालना शहरात भव्य तिरंगा रॅली 

रामनगर (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाच्यावतीने देशभरात आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा यात्रेचा उत्साह जालन्यातही मोठ्या उत्साहात पाहायला मिळाला. भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती, रॅलीत मा.आ. अर्जुन भाऊ खोतकर, आ.संतोष दानवे, आ.बबनराव लोणीकर, भाजपा शहर अध्यक्ष भास्कर दानवे, ग्रामीण अध्यक्ष आ.नारायण कुचे आदी घटकांतील नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

रॅलीच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश देत सैनिकांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शविण्यात आला. रॅली दरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देत परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

रॅलीमध्ये विविध झोनमधील नेते, कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. तसेच, विद्यार्थ्यांचा सहभाग देखील लक्षणीय होता. तिरंगा हातात घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली शहराच्या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली.

या प्रसंगी रावसाहेब दानवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना देशासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, “तिरंगा हा आपल्या अभिमानाचा आणि स्वातंत्र्याचा प्रतीक आहे. या यात्रेमुळे नव्या पिढीत देशभक्तीची भावना रुजेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *