- महाराष्ट्रातील ११वी प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ ला सुरुवात – विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित
- क्रांतीभूमी मराठी न्युज: – महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने ११वी (इ. ११ वी) प्रवेश प्रक्रियेची अधिकृत सुरुवात दिनांक १९ मे २०२५ रोजी केली. विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुलभ व पारदर्शक प्रवेश प्रणाली उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवली जात आहे.
प्रवेश प्रक्रियेचे पोर्टल https://mahafyjcadmissions.in वर कार्यान्वित करण्यात आले असून, यामध्ये विद्यार्थी, पालक तसेच संबंधित शाळांचे अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांना सर्व मार्गदर्शन आणि माहिती मिळणार आहे.
ऑनलाईन नोंदणीची वेळापत्रक
विद्यार्थ्यांनी १९ मे ते २३ जून २०२५ दरम्यान ऑनलाईन फॉर्म भरून नोंदणी करायची आहे. ही नोंदणी महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. दिनांक २४ मे २०२५ पासून विद्यार्थ्यांचे माहिती भरणे व अर्ज भरून सबमिट करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
त्याआधी प्रवेश प्रक्रियेची माहिती समजावून घेण्यासाठी २२ मे २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारद्वारे संपूर्ण मार्गदर्शन दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमार्फत किंवा वैयक्तिकरित्या हे वेबिनार पाहता येईल.
तांत्रिक मदतीसाठी सुविधा
विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण आल्यास किंवा तांत्रिक अडथळा आल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधता येईल:
अधिकृत संकेतस्थळ: https://mahafyjcadmissions.in
ई-मेल: support@mahafyjcadmissions.in
हेल्पलाइन क्रमांक: ८३०५९९५१५६
शिक्षण संचालनालयाचे आवाहन,
शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी विद्यार्थ्यांनी आपली माहिती काळजीपूर्वक भरावी आणि सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करावीत, असे आवाहन केले आहे.
Leave a Reply