परभणी जिल्ह्यात २८ व २९ मे रोजी वादळी वाऱ्याचा इशारा — प्रशासन सतर्क
क्रांतीभूमी मराठी न्युज: – परभणी भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून दिलेल्या इशाऱ्यानुसार, परभणी जिल्ह्यात २८ व २९ मे २०२५ रोजी वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालय, परभणी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
२६ मे रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, प्रशासनाने संभाव्य आपत्तींना तोंड देण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी ठेवण्यास सांगितले आहे. वीज यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पोलीस, कृषी विभाग, ग्रामसेवक आदींनी आपापल्या स्तरावर सज्ज राहून नागरिकांना त्वरित मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या काळात नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, झाडांखाली थांबू नये, विजेच्या तारांपासून दूर राहावे, अशा सूचना हवामान खात्याने दिल्या आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply