सततच्या पावसामुळे नवीन बांधकाम केलेले विहीर कोसळली शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान
क्रांतीभूमी मराठी न्यूज :- ( मुकेश डुचे) अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील शेतकरी सतीश दासूपंत खारतूडे यांनी लाखो रुपये खर्च करून नवीन विहीर खोदकाम केले होते अंत्यन्त हालकीची परिस्थिती मध्ये स्वतः जवळचे पैसे आणी खाजगी सावकार कडून कडून पैसे घेऊन विहिरीचे कामकाज करण्यात आले होते .परंतु मागील दहा दिवसापासून सतत पाऊस असल्यामुळे ती विहीर खचून कोसळली आहे संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. कुटुंबाचे उदरनिवाह करण्यासाठी आपलं वार्षिक उत्पन्न वाढण्यासाठी शेतकरी हा नियमित प्रयत्नशील असतो, त्यामध्ये शिरसगाव येथील शेतकऱ्याचे लाखो रुपयाची नुकसान झालेले आहे संबंधित विहिरीचे पंचनामे होऊन नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
Leave a Reply