डोंगरवाडी गावाजवळ रस्ता खचल्याने स्थानिक नागरिक त्रस्त – महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून मुख्यमंत्री यांना निवेदन

डोंगरवाडी गावाजवळ रस्ता खचल्याने स्थानिक नागरिक त्रस्त – महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून मुख्यमंत्री यांना निवेदन

क्रांतीभूमी मराठी न्युज , पुणे/ मुळशी :- पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर डोंगरवाडी (ता. भोर) गावाजवळ रस्ता खचल्यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या भोर तालुका अध्यक्ष राजू फाले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या वर्षी रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णतः बंद झाली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने पर्यायी मार्ग तयार करून तो काही कालावधीसाठी सुरु ठेवला. मात्र, ११ मे २०२५ रोजी पुन्हा एकदा रस्ता खचल्याने गावाच्या मुख्य रस्त्याचा वापर करण्यात आला. परिणामी गावातील शांती व सुरक्षेला धोका निर्माण झाला असून नागरिकांना वाहनांचा त्रास सहन करावा लागत आहे.

राजू फाले यांनी निवेदनात म्हटले आहे की, २५ मे रोजी अचानकपणे वाजलेल्या सायरनने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. विषारी वायू टाकी फुटल्याची अफवा पसरल्याने शाळकरी मुले व नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. या प्रकारामुळे नागरिकांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य पक्षाने मागणी केली आहे की, या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जबाबदार अधिकार्‍यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच MSRDC चे अधिकारी वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

राजू फाले यांनी मुख्यमंत्री यांना विनंती केली आहे की, संबंधित प्रकरणात तातडीने लक्ष घालून स्थानिक प्रशासनाला आवश्यक त्या सूचना द्याव्यात, जेणेकरून नागरिकांचे नुकसान होणार नाही आणि वाहतूक सुरळीत सुरु राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *