बारसवाडा येथे शिवराज्यभिषेक दिन उत्साहात साजरा
क्रांतीभूमी मराठी न्यूज, (पंढरीनाथ माळकरी ) अंबड तालुक्यातील ग्रामपंचायत मौजे बारसवाडा येथे शिवराज्यभिषेक दिन उत्सवात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवराय यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून मानाचा मुजरा करण्यात आला .त्यावेळी सरपंच रामेश्वर खंडागळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी माजी सरपंच किसन तात्या गायकवाड ग्रामपंचायतचे सदस्य विष्णू मिठे, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ मुळक, विठ्ठल चापते ,संतोष गायकवाड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
Leave a Reply