अंबड पंचायत समिती येथे घरकुल लाभार्थी यांनी घातला घेराव

अंबड पंचायत समिती येथे घरकुल लाभार्थी यांनी घातला घेराव

घरकुल विभागाला कर्मचारी नसल्यामुळे बिल जमा होण्यास अडथळा आज एखादे नेमणूक त्यानंतर लाभार्थी शांत

क्रांतीभूमी मराठी न्यूज  : देशात प्रत्येक नागरिकाला घर मिळावे म्हणून शासन विविध स्तरावर योजना राबवत आहे त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना ,शबरी आवास योजना, वसंतराव नाईक ,अशा विविध योजनेमार्फत प्रत्येक नागरिकाला घर मिळावे हा मुख्य उद्देश असताना ,पंचायत समिती अंबड येथे मागील काही दिवसापासून डाटा एन्ट्री ऑपरेटर नसल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना त्यांचे हप्ते जमा होण्यास विलंब लागत असल्याकारणाने आज रोजी दिनांक 17 जून 2025 रोजी सकाळी घरकुल लाभार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालय अधिकाऱ्याला घेराव घातला जोपर्यंत संबंधित विभागाला कर्मचारी नेमणूक होत नाही व आमच्या हप्ते जमा होत नाहीत तोपर्यंत उठणार नाही असा इशारा लाभार्थ्यांनी दिला. त्यावर काही वेळानंतर संबंधित गटविकास अधिकारी यांनी तीन तासाच्या प्रतीक्षेनंतर संबंधित घरकुल विभागाला डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची नेमणूक चे आदेश देण्यात आले. मागील काही दिवसापासून घरकुल लाभार्थ्यांची बिल अधाप पर्यंत जमा न झाल्यामुळे व्याज व्यवहार करून काही लाभार्थ्यांनी घर उभारणी केली होती, परंतु जवळचे पैसे व्याजाचे पैसे संपल्यानंतरही पैसे मिळत नसल्यामुळे असा पर्याय काय निवडू नये असा प्रश्न संबंधित लाभार्थ्यांनी अधिकाऱ्यांना केला .संबंधित विभागाला कर्मचारी निवडीनंतर लाभार्थ्यांनी समाधान मानले.

त्यावेळी आखील भारतीय ग्राहक पंचायत चे पदाधिकारी डॉ रमेश तारगे निव्रृत्त मंडळ अधिकारी पोतदार हनुमान भगत धर्मराज खापरे वकंर कानकाटे योगेश भडांगे भागवत ऊढाण साहेबराव राठोड यासह दोनशे च्या जवळपास घरकुल लाभार्थी नी पंचायत समिती सभापती दालनात घरकुल विभागाचे वैष्णव आणि कार्यालयीन प्रमुख यांना घेराव घालत जो पर्यंत ऑपरेटर नेमत नाही तो पर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नाही अशी भुमिका घेत सकाळी 10.30 ते 1 वाजेपर्यंत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले त्यामुळे अर्जुन कव्हळे आणि सचिन पवार यांची नेमणूक गटविकास अधिकारी राजपुत यांनी केली शेवटी लेखी ऑर्डर काढल्यानंतर ठिय्या आंदोलनाचा समारोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *