छत्रपती संभाजी नगरात काळा गणपती जवळ भीषण अपघात
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी बबन घोडे : –
छत्रपती संभाजी नगर सिडको परिसरातील सुप्रसिद्ध काळा गणपती मंदिराजवळ आज पहाटे सव्वा नऊच्या सुमारास भरधाव कार ने (M H 20H 0746) अनेक वाटसरूंना व सुरक्षा रक्षकाला जोराची धडक दिली. या अपघातात सुरक्षा रक्षक गुणाजी शेवाळे व 76 यांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात गंभीर जखमी मनीषा विकास मांडणे वय 40 विकास मानधने वय 50 रवींद्र भगवंत चौबे वय 65 श्रीकांत प्रभाकर वय 60 या जखमींना एमजीएम व मिनी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कारचालक प्रशांत एकनाथ मगर राहणार सिडको यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a Reply