माजी खा. समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत ६ जुलै यवतमाळ येथे समता परिषदेची बैठक
अमरावती प्रतिनिधी गणेश मानकर: दि. ५ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक ६ जुलै रोजी समता परिषदेच्या , अमरावती आकोला, यवतमाळ या तीन जिल्ह्यांची आढावा बैठक यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकीला जिल्हा पदाधिकारी सर्व तालुकाध्यक्ष तालुका, कार्यकारणी आणि समता सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृह येथे अमरावती जिल्ह्याची वेळ, दुपारी ३ वाजता सदरील बैठक संपन्न होणार आहे. यावेळी माजी खासदार तथा समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन करणार असून त्या अनुषंगाने अमरावती व यवतमाळ आकोला जिल्ह्याचा आढावा घेणार आहे. तरी या बैठकी तीनही जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी सर्व तालुकाध्यक्ष, तालुका कार्यकारणी, पदाधिकारी व समता सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समता परिषदेच्या अमरावती जिल्हाध्यक्षा सौ. ज्योतीताई बाविस्कर यांनी केले आहे.
Leave a Reply